संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी धैर्य, हिम्मत, सहनशीलता व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेवर विश्वास ठेवून कार्य केले तर न्याय हमखास मिळेलच. अशी ग्वाही देत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समस्या सोडविण्यास सतत लढत राहणार , प्रथम शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित हेच माझे ध्येय असल्याचे नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मार्गदर्शन करतांना ग्वाही दिली .महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने १५ मार्च रोजी एक दिवसीय ३२ वें जिल्हा अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कॉम्पलेक्स गडचिरोली परिसरात पार पडले त्यावेळी ते बोलत होते .
पुढे बोलताना गाणार यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी जुनी पेन्शन योजना किती महत्त्वाची आहे. हे स्पष्ट करून OPS, NPS , RPS , Gps . .,NPS आणि UPS मधील बारकावे, आश्वासित प्रगती योजना १०,२०,३०. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची समस्या, शिक्षक पात्रता परिक्षा (त्यात ) यावर संघटनेची भूमिका , चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद पुनर्स्थापित करणे , मराठी माध्यमांच्या शाळांचे भवितव्य व अस्तित्व ,अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन.
इत्यादी विविध विषयांवर चिंता, समस्या व उपायांवर सखोल मार्गदर्शन केल
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह सागर आडे यांनी अधिवेशन का व कशासाठी घेण्यात आले त्याबद्दल सविस्तर सांगितले .
अधिवेशनाला उपस्थित पाहुणे व सेवानिवृत्त पदाधिकाऱ्यांचे व जागतिक महिला दिना निमित्य घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धाचे बक्षिस , शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले .
या अधिवेशनाचे उद्घाटन माजी खा. अशोक नेते यांचे हस्ते पार पडले तर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल नुतिलकंठावार , प्रमुख मार्गदर्शक माजी आ. नागो गाणार ,राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा . रमेश बारसागडे , माजी आ. सुधाकर कोहळे , चागदेव फाये , प्रमुख अतिथी अजय वानखेडे अध्यक्ष नागपूर विभाग, कोषाध्यक्ष नागपूर विभाग संतोष सुरावार , डॉ . मनीषाताई वाकोडे महिला आघाडी प्रमुख नागपूर , सुधिर वारकर कार्यलय मंत्री , शिक्षक संदेश प्रमुख घनश्याम मनबतुलवार आदिची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी माजी खासदार अशोक नेते म्हणाले की शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा अनेक समस्या आहेत जुनी पेन्शन योजना लागु करणे महत्वाचे आहे त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमास विजय साळवे प्राथमिक विभाग अध्यक्ष रंजनाताई कावळे ,कार्यवाहक हेंमत बेलखोडे , कोषाध्यक्ष राहुल शेंदरे ,
प्रफुल्ल घुटके , जिवन उईके , रेखा नाकाडे , महेश तुम्पलीवार, विश्वजित लोणारे , संजय भांडारकर , धनेंद्र चौधरी, मृणाल तुम्पल्लीवार , वनिता आयलवार , शारदा श्रीरमे , इम्रान पठान , जानिकराव नन्नावरे , नरेश चुटे , दिलीप तायडे,मनोज बोमनवार, रहेजा,चंद्रकांत बुरांडे, विजय साळवे, अतुल सुरजागडे, कल्पना खेडुलकर,आरती बंडावार, समीक्षा सुरावार, ज्योती जिचकार, तसेच जिल्हा व सर्व तालुका पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तकर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन वैशाली मडावी प्रस्ताविक जिल्हा कार्यवाह सागर आडे , आभार शारदा श्रीरामे यांनी मानले.








