संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:- अल्लापल्ली वन परिक्षेत्र व तत्कालीन परमिली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. गौरव गणवीर पांनी सन २०२३-२०२४ या कार्यकाळातील रोप वने, कुप कामे, योजना व योजनेत्तर मध्ये प्रचंड मोठे प्रमाणात बोगस मजुरांचे नावे बोगस स्वाक्षरी मारुन कोटयावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा आदिवासी उपयोजना व डिपीटीसी मधून वळती करुन संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत केलेल्या निकृष्ट दर्जाचे कामे व काही कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करुन उच्चस्तरीय IFS दर्जाचे अधिकाऱ्यांमार्फत तक्रारकर्तासमक्ष चौकशी समिती नेमणूक करावी
तसेच पेंडीगुडम वन परिक्षेत्रातील तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी भावना अलोणे वांची उच्चस्तरीय IIS दर्जाचे अधिकार्यामार्फत तक्रारकर्तासमक्ष चौकशी समिती नेमणूक करावी अशी मागणी
अखिल भारतीय प्रष्टाचार निमूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी पत्रकातुन केली असुन ते दिनांक 13 मार्च पासुन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक ) वनवृत् गडचिरोली कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत.
आलापल्ली वन विभागातील आलापल्ली वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी व तत्कालीन पेरमिली वन परिक्षेत्राचे श्री. गौरव गणवीर यांनी त्यांच्या कार्यकाळात बोगस मजुरांचे नावे बोगस स्वाक्षऱ्या करुन पैसे काढून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्याविरुध्द आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व राष्ट्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली मागील ५० दिवसापासून मा. मुख्य वन संरक्षक (प्रादे.) गडचिरोली बनवृत्त,
चिरोली यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करुन सुध्दा त्यांच्यावर वनविभाग व प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. कार्यवाही करु असे आश्वासन देऊन आपले आंदोलन स्थगित करण्यात यावी असे लेखी स्वरुपात देण्यात आले. काही महिणे आम्ही आपले आंदोलन स्थगिती ठेवून शासन प्रशासनावर चौकशी अधिकार्यावर विश्वास केला पण आतापर्यंत कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आलेली नाही. चातूरमातूर मॅनेज चौकशी करुन वरिष्ठ अधिका-यांना व आंदोलनकर्त्यांना दिशाभूल करणारे चौकशी अहवाल बनवून वरिष्ठांना सादर करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे, तसेच वन परिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांना निलंबित न करुन चौकशी केल्याने संबधित वन परिक्षेत्र अधिकारी श्री. गौरव गणवीर आपल्या पदाचा गैरवापर करुन चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन आपला स्वतःचा बचाव करीत आहे आणि हे पदावर असल्याने आपल्या पदाचा गैरवापर करुन चौकशीत अडथळा निर्माण
करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करून चौकशी करण्यात यावी. त्यांच्या कार्यकाळात प्रचंड मोठया प्रमाणात निकृष्ट दर्जाचे कामे, बोगस मजूरांचे नावं कोटयावधी रुपयांचे भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे
तसेच त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी सुध्दा त्यांच्या भ्रष्ट्राचार व मनमानीला कंटाळून उपवनसंरक्षक (प्रादे.) आलापल्ली व मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) वनवृत्त गडचिरोली यांना तक्रार सादर केली आहे व त्यांच्याविरुध्द सामूहिक उपोषण करणार होते पण वरिष्ठ IFS दर्जाचे अधिका-यामार्फत चौकशी केलीअसता त्या चौकशीमध्ये श्री. गौरव गणवीर यांनी दोषी आढळले आहे असे भ्रष्ट वन अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करुन चौकशी करण्यात यावी
श्री. गौरव गणवीर यांना तात्काळ निलंबित करुन उच्चस्तरीय IFS दर्जाचे अधिकाऱ्यांमार्फत तक्रारकर्तासमक्ष चौकशी समिती नेमणूक करून तसेच पेंडीगुडम वन परिक्षेत्रातील तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी भावना अलोणे यांची उच्चस्तरीय IFS दजांचे अधिकाऱ्यांमार्फत तक्रारकर्तासमक्ष चोकशी समिती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शंकर ढोलगे यांनी केलेली आहे. शंकर ढोलगे यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ता रवि सेलोटे अनुप माहोरकर विजय भज्जी आदि सहीत उपोषणाला बसले असून रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी मंडपाला भेट देऊन उपोषण कर्त्यांची विचारपुस केली.








