संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:- वाघ वाचविण्यासाठी जेवढी चळवळ केल्या जातो तेवढी चळवळ मधमाश्या वाचविण्यासाठी कुठेही दिसत नाही. दोन्ही घटक महत्वाचे व पुरक आहे तेव्हा मधमाश्या वाचविण्यासाठी चळवळ उभी करावी अशी माहीती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती ( राज्यमंत्री दर्जा ) रविंद्र साठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयीत झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहीती दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते.
आदिवासी व ग्रामीण भागात मधमाशी पालनास चालणा मिळावी व रोजगार निर्मिती व्हावी हाच योजनेचा उद्देश असुन गडचिरोली जिल्ह्यातील लखामेंढा व दराची या दोन गावाची निवड करण्यात आलेली आहे तर कुमलगुंडा व कोंदावाही या गावातील शेतकऱ्यांना शंभर पेट्या देण्यात आलेल्या आहेत. विशेषता ग्रामीण महिला व स्वयं सहाय्यता गटांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे असेही सभापती रविंद्र साठे यांनी सांगितले.








