संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-गडचिरोली पंचायत समिती अर्तगत येत असलेल्या मुरमाडी ग्रामपंचायत मधील बौध्द वस्तीत घाणीचे साम्राज्य असुन ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व प्रशासक यांचे दुर्लक्ष दिसते. सदर वस्तीतील नाल्यामध्ये कचरा काडी भरली असुन त्यावर सांडपाणी येतो नालितील दुषित पाणी जलजन्य किटकजण्य मुळे मच्छराचा प्रार्दुभाव वाढला असून आजाराची समश्या निर्माण झालेली आहे.
वर्षातुन एकदाही नाली साफ होत नाही आता तर पावसाळा सुरु होण्यापूर्वी नाली सफाई व्हावी मागील महिला ग्रामसेवक पाहणी करीत होत्या परंतु गावातील काही लोकांनी तिला त्रास दिलामुळे तिने चक्क नोकरीचा राजीनामा दिला आता दुसरे ग्रामसेवक आले परंतु तेही हप्त्यातुन एक दिवश येतात त्यामुळे ग्रामसेवकांचे दुर्लक्ष आहे. सदर बाबीकडे ग्रामसेवक व प्रशासनाने लक्ष घ्यावे अशी मागणी गावकरी राहुल बांबोळे प्रफुल बांबोळे प्रकाश बनसोड यांनी संवर्ग विकास अधिकारी प.स. गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.











