✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– पवित्र ईद-उल-फितर सणाच्या निमित्ताने राजुरा शहरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले. मुस्लिम समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण केली. या शुभप्रसंगी राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक स्वागत करत ईद-उल-फितरच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी समाजात ऐक्य, शांतता आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्याचा संदेश यावेळी दिला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अँड. अरूणभाऊ धोटे, सिद्धार्थ पथाडे, संस्थेचे संचालक साईनाथ बतकमवार, सागर लोहे, अभिजीत धोटे, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद, गोलू ठाकरे, संतोष गटलेवार, भूषण बानकर, सय्यद साबिर, हेमंत झाडे यांच्यासह राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण शहरात सणाच्या निमित्ताने उत्सवी वातावरण असून सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश या निमित्ताने दिला गेला.













