✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली – बौद्ध धम्म हा शिलाचे पालन करणारा धम्म आहे कारण बुद्धाचा धम्म शिलावर आधारित आहे. धम्माचे मुळच शिल आहे म्हणुन प्रत्येकांनी शिल आचरणात आणने आवश्यक आहे कारण शिल आचरणात नाही तर आनापानाला काही महत्वच राहणार नाही अस्या प्रकारचे मार्गदर्शन अखिल भारतिय भिक्खुसंघाचे अध्यक्ष भन्ते आनंद बुद्धगया यांनी ब्रम्हपुरी येथील राजीव गांधी सभागृह येथे दि. २२ मार्चला पार पडलेल्या बौद्ध धम्म परिषदेते केले.
धम्ममाला फाऊंडेशन ब्रम्हपुरीच्या वतीने घेण्यात आलेल्या बौध धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणुन पुज्य भन्ते आनंद हे लाभले होते तर उदघाटक छबुताई काळबांधे नागपुर यांचे हस्ते पार पडले मंचकावर पुज्य भन्ते बुद्धघोष भन्ते सत्यानंद भन्ते अभयनायक भन्ते प्रज्ञानंद भन्ते भारतद्वाज भन्ते सुबोध भन्ते धम्मविरिय चामोर्शीआदि लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. राजकुमार शेंन्डे धम्मबंधु प्रा. मुनिश्वर बोरकर सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत इंजि. सोनुताई रामटेके पुणे आदिची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून विनोद माटे ब्रम्हपुरी तर आयोजक गुणवंत डोर्लीकर हे होते.
याप्रसंगी भन्ते सत्यानंद भन्ते प्रज्ञानंद डॉ. राजकुमार शेंन्डे प्रा. मुनिश्वर बोरकर इंजि. सोनुताई रामटेके शुशीला भगत यांचेही धम्माप्रती मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंत डोर्लीकर संचालन भन्ते धम्मानंद खापरी तर आभार धम्मा मुंडरके यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य उपापकांची उपस्थिती होती.









