✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यकीना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार दिल्या जातो अश्यातच चुरमुरा गडचिरोली येथील गायक व वेशनमुक्तीचे कार्य करणारा विजय शेंन्डे यांना २६ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथील कार्यक्रमात मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील मनोहर हेपट केशव चव्हाण सुर्यप्रकाश गभने तुळशीराम उंदिरवाडे व विजय शेंन्डे यांची निवड करून पुरस्कार देण्यात आले.
सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट माजी मंत्री शिद्धाराम म्हेत्रे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या उपस्थितीत विजय शेंन्डे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला.








