✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 29 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता घडली. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील कुरुड-कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी 3 वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 या प्रवासी ट्रॅव्हल्सशी स्कॉर्पिओची टार्निंग वर जोरदार धडक झाली. धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सध्या उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
❌मिळालेल्या माहितीनुसार, कुरुल रामपूर येथील विवाह सोहळा आटोपून १६ वऱ्हाडी स्कॉर्पिओने भाडभीडीकडे परतत होते. गाडीत लग्नाची गाणी आणि हास्यविनोद सुरू असतानाच, गडचिरोलीकडून येणाऱ्या ‘प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या बसने स्कॉर्पिओला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता, तर जखमींच्या किंकाळ्यांनी परिसराचा थरकाप उडाला. या अपघातात कुणघडा येथील विमल कान्हुजी गव्हारे, सुमन देवाजी गव्हारे, भडभीडी येथील अनिकेत साईनाथ बरलावार आणि गट्टेगुडा येथील ८ वर्षांची चिमुकली आरोही मोगरकर यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन बालपणीच आरोहीचा असा करुण अंत झाल्याने गट्टेगुडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








