सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला चे रहिवासी माधुरी चंद्रय्या बंधुवार सरस्वती मलय्या सापा कांता मलय्या सापा चंद्रकला मलय्या सापा यांची वडीलोपार्जीत जमीन चेक स.न १० आराजी 1. 10 हेक्टर आर असुन टेकडाताल्ला (जाफ्राबाद ) येथील रेपाला नारायण लस्मय्या वय ७५ वर्ष हे बळजबरीने जमीन कसत आहे .मुळ मालक जमीन करायला गेलेत तर त्यांना जिवे मारण्याची धमकी देतो अश्या मुजोर मानसानां वळणीवर आणण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावे या मागणीसाठी उप जिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांचेकडे रिपाईच्या एका शिष्ठ मंडळाने निवेदन दिले शिष्ठ मंडळात निवेदन देतांना आरपीआय चे नेते गोपाल रायपुरे आरपीआय जिल्हा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर आरपीआय सिरोंचा प्रमुख शंकर पी. सेनीगरपु माधुरी चंद्रय्या बंधुवार कांता मालय्या सापा आदिनी दिले. केस न. 27 / 2005 दिनांक ५ / ९ / २००५ अन्वये विद्यमान कोर्ट सिरोंचा यांनी जमीनीचा ताबा अर्जदार यांना देण्या बाबत आदेश केलेला असनांना सुद्धा गैरअर्जदार कोर्टाला न जुमानता गरीबांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा आमच्या मालकीची जमीन आम्हाला मिळाली त्याकरीता पोलीस संरक्षण घ्यावे अशी मागणी अर्जदारांनी केलेली आहे.