✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-पंचाशिल बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली वतीने
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ ला विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येत आहे.
यात सामान्यज्ञान स्पर्धा रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने पार पाडली जाणार असुन विविध स्पर्धासाठी योग्य बक्षीस देण्यात येणार आहे. दि. १३एप्रिल सकाळी ७ वाजता विश्वरत्न युथ फांउडेशन तर्फे भव्य बाईक रॅली रेड्डी गोडावून ते शहराच्या विविध भागात फिरणार असुन दि. १२ एप्रिलला समाज प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल मेश्राम तर उदघाटक म्हणुन खासदार डॉ. नामदेवराव किरसान सहउदघाटक म्हणुन नगरसेवक बाळूभाऊ ढेंभुर्णे प्रमुख पाहुणे धर्मानंद मेश्राम नगरसेवक श्रीकांत देशमुख आदि लाभणार असुन रात्रौ प्रबोधकार संदिप पाल महाराज यांचा समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहे. तर दि. १४ एप्रिल सकाळी ९ वाजता मुख्य कायक्रमाचे अध्यक्ष राहुल मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणुन शेकापे चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे अँड. बोधी रामटेके चामोर्शी डॉ. उज्चला शेन्डे नगरसेवक श्रीकांत देशमुख आदि लाभणार आहेत
तरी होवू घातलेल्या भरगच्च कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन पंचशिल बौद्ध समाज मंडळ रामनगरचे अध्यक्ष राहुल मेश्राम उपाध्यक्ष राहुल वाकडे सचिव वृषभ रामटेके सहसचिव हर्षल केसलापुरे कोषाध्यक्ष रुपेश रामटेके राहुल खोब्रागडे रोशन उके आशिष शेंन्डे महिला मंडळाच्या पदाधिकारी डॉ. उज्वला शेंन्डे राधा नांदगाये धाराबाई मेश्राम आदिनी केलेले आहे.









