तालुका प्रतिनिधी प्रविण चिडे विरुर
विरुर : विरुर क्षेत्रातील मंडळ अधिकारी सुभाष साडवे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत असून त्यांच्या कार्याचा व जीवनप्रवासाचा परिसरात विशेष गौरव केला जात आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या साडवे यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली आहेत.
शेतीचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या साडवे यांनी लहानपणापासूनच मेहनतीचे धडे गिरवले. शेतीची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर तलाठी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. हीच त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. पुढे आपल्या कामगिरीच्या बळावर त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते मंडळ अधिकारी या पदावर विराजमान झाले.
मंडळ अधिकारी म्हणून काम करताना साडवे यांनी प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जनतेशी जवळीक या गुणांची जपणूक केली. शहरात कार्यरत असूनही त्यांनी गावाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. गावातील नागरिकांशी त्यांनी नेहमीच आत्मीयतेने संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्परता दाखवली.
सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गावाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेताना दिसले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे ते नागरिकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करू शकले.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, ते लवकरच सेवा निवृत्त होणार असल्याने परिसरात एक वेगळीच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. मंडळ अधिकारी म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका ही कायम स्मरणात राहणारी ठरेल.
सुभाष साडवे यांचा जीवनप्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी असून “कष्ट आणि जिद्द असेल तर यश निश्चित मिळते याचे ते उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभावे, अशी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.








