✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरत, इन्फंट क्रिकेट क्लब, राजुरा याचे उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, उद्घाटक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे आणि प्रमुख अतिथी इन्फंट संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, अँड. चंद्रशेखर चांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टी-२० क्रिकेट सामन्याने कार्यक्रमात रंगत आणली. इन्फंट क्रिकेट क्लब, राजुरा आणि एस.के. सहारा क्लब, बल्लारशा यांच्यात झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बल्लारशा संघाने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवत बाजी मारली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर, प्रदीप नागोसे, अहमद शेख, ईश्वर पोत्राला, स्वप्नील ढाभारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला.
⏬⏬⏬⏬⏬









