संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली .
गडचिरोली :–विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त चामोर्शी तालुक्यातील घोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण सोहळा दि. १४ एप्रिल 2026 ला दुपारी १२ वाजता उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आमदार निधितुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ. मिलिद नरोटे प्रणय खुणे सुरेश शहा शितालाताई भोलुभाऊ सोमनानी तर प्रमुख पाहुणे म्हणुन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सरपंच रुपाली दुधबावरे डॉ. चंद्रसुरेख डोंगरवार इंजि. सोनुताई रामटेके पुणे , ठाणेदार शिंदे घोट उपप्राचार्य राजन गजभिये आदि लाभणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष बौध्द समाज मंडळ घोट सर्कल चे अध्यक्ष विशाल दहिवले हे असुन कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन घोट इलाखा परिसरातील बौद्ध बांधवांनी केलेले आहे.








