
पत्रकार. मंगेश बन्सोड
उपक्षेत्रातील जंगलात रानडुकराची शिकार करून त्याचे मांस शिजवणाऱ्या एका टोळीला वनविभागाने रंगेहात पकडले आहे. १० एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.नेमकी घटना काय?शुक्रवारी सकाळी गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. भेंडेकर यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मारोडा व पेकिंगकसा गावातील काही व्यक्ती रानडुकराची शिकार करून त्याचे मांस घरी शिजवत आहेत. या माहितीची खात्री पटताच वनविभागाच्या पथकाने तातडीने या गावांमध्ये छापेमारी केली आणि नऊ जणांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेले आरोपी:अटक केलेल्या आरोपींमध्ये मारोडा आणि पेकिंगकसा येथील रहिवाशांचा समावेश आहे:मारोडा येथील: ताराचंद जागेश्वर नेवारे, सूरज नाजूकराव तुंकलवार, बाळकृष्ण भिवा गेडाम, शंकर पांडुरंग तोडासे, अरुण वसंत चापले, प्रफुल सुरेश तोडासे, सुरेश यादव तोडासे.पेकिंगकसा येथील: वासुदेव धर्मा हिचामी, विलास देवाजी दरो.कडक कायदेशीर कारवाईसर्व आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्यांना गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी १३ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. आरोपींनी यापूर्वीही वन्यप्राण्यांची शिकार केली आहे का, या दिशेने आता वनविभाग अधिक तपास करत आहे.वनविभागाचे पथक सतर्कगुरवळा उपक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल यांसारख्या विविध वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या भागात ‘नेचर सफारी’ देखील असल्याने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाचे पथक नियमित गस्त घालत असते.ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक व्ही. एस. आर्या आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. डी. भेंडेकर, जितेंद्र सोरदे, सुनील पेंदोरकर, अमित दंडेवार, प्रदीप गेडाम आणि ए. एस. उरकुडे यांच्या पथकाने केली





