लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
निलंगा – पानचिंचोली ता. निलंगा येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घरात काम करत असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेला तिच्या साडीने हात पाय बांधून २५ वर्षीय तरुणाने जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ता. 22 रोजी घडली असून कोणाला सांगितलीस तर तुला याच ठिकाणी जिवे मारतो अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या असून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पानचिंचोली येथील पीडित महिला आपल्या घरामध्ये काम करत असताना, याच गावातील प्रवीण बंकट जाधव (वय २५) याने घरात घुसून महिलेवर जबरदस्तीने हातपाय बांधून बलात्कार केला. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे.
✴️झाले पोलिसांची तत्परता; नराधम अटकेत घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. आरोपी प्रवीण जाधव याच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर कडक कारवाई करून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.








