✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-महाराष्ट्र पोलीस दलात बजावलेल्या अत्यंत उत्कृष्ट, उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जाणारा सन २०२६ चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा ‘पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह’ (DG Insignia) पदक चंद्रपूर पोलीस दलातील चार कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे चंद्रपूर पोलीस दलाची मान संपूर्ण राज्यात अभिमानाने उंचावली आहे.
















