लातूर, जि. प्र. (उत्तम माने)
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात संतापजनक घटना घडली असून जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती राहिली आहे. त्यामुळे आईने दिलेल्या फिर्यादीवरून जन्मदात्या बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धक्कादायक आणि संतापजनक घटनांची मालिका सुरु आहे. नसरापूर आणि बीडनंतर आता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून अत्यंत अमानवी प्रकार उघडकीस आला आहे.
👉👉बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुलगी गर्भवती असल्याचं समोर आले आहे. या (Aggressive girls abuse) प्रकरणात पीडित मुलीच्या आईने १७ एप्रिल रोजी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीकडून मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पीडित मुलगी सुमारे १९ आठवडे २ दिवसांची गर्भवती असल्याचे समोर आले होते, त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
💢तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत संबंधित आरोपी वडिलांनीच हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या (Aggressive girls abuse) प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.














