✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– इयत्ता बारावी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इन्फंट जिजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट जिजस सायन्स कॉलेज, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून युवराज सुभाष तुम्मेवार याने ९४.१७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावित संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच महाविद्यालयातून हेमांगी सुनील पायपरे हिने ८४.५० टक्के गुणांसह द्वितीय, आरती शंकर पहानपटे हिने ८४.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. याशिवाय ओम किरण लांडे (८२.१७%) याने चौथा तर निशांत निलकंठ गोहणे (८०.३३%) याने पाचवा क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी युवराज तुम्मेवार सह सर्व गुणवंतांचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, प्राचार्य, प्राध्यापकवृंद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.













