✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
नागपूर:-बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरात बाल संरक्षण पथकाने सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी नारायणा प्रोसेस फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बिस्किट कारखान्यावर धाड टाकून तेथील नऊ बाल कामगारांची सुटका करण्यात आली या प्रकरणांमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल व्यक्तींमध्ये शशी नायर, वैभव मेहता, मनोज भगत, जुगल प्रधान यांचा समावेश आहे परंतु नारायणा फुड्स प्रोसेसिंग लिमिटेड या कंपनीमध्ये एकूण चार डायरेक्टर असून त्यांच्यापैकी फक्त शशि नायर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे उरलेल्या तीन संचालकांवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे. उर्वरित तीन संचालक यांच्यावर कार्यवाही नाही झाल्या मुळे ते या प्रकरणातील साक्षीदाराना दमदाटी करून प्रभावित करू शकतात म्हणून 1) सुरेश नायर 2) सुनील मेमन 3) श्रीनिवास नायडू यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नागपूर शहर महासचिव रजत महेशगवळी यांनी मा कामगार आयुक्त, नागपूर जिल्हा, मा.महिला व बालविकास अधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिले व मागणी केली यावेळी प्रशिक गाडगे, शुभम प्ररतेकी, मनोज वासनिक, सुरेश खोब्रागडे, शुभम वनकर आदी उपस्तित होते.













