✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– इन्फंट जीझस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस हायस्कूल, राजुरा यांनी इयत्ता दहावी (SSC Board) परीक्षेच्या २०२५-२६ च्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या सर्व ३२ विद्यार्थ्यांनी यश मिळवत १०० टक्के निकाल नोंदविला असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या निकालात २७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळविले, तर ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तन्वी देवराव बोन्सुले हिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. घनश्याम विकास उलमाले याने ८८.८० टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळविले. तसेच वेद विजयराव पिप्परवार, आदित्य प्रेमदास मेश्राम आणि स्वरा अभय चन्ने या तिघांनी प्रत्येकी ८८.६० टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सर्व संचालक, मुख्याध्यापक सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफीक अन्सारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.













