साची सत्यपाल उपरे प्रथम तर निदा इरफान शेख दुसरी
निदा इरफान शेख 87% गुण घेऊन विद्यालयात दुसरी
प्रविण चिडे विरुर तालुका प्रतिनिधी
विरुर स्टेशन येथील गुरुनानक विद्यालय विरुर स्टेशन चा यावर्षी दहावीचा निकाल 80 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे.
यामध्ये साची सत्यपाल उपरे हिने 88.20 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला, तर निदा इरफान शेख हिने 87 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे गावात व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक धानोरकर सर, तसेच उराडे सर, मोरे सर व बेले सर यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी पालकांनीही विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता याबद्दल समाधान व्यक्त केले. गुरुनानक विद्यालयाने ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
















