शेरज :-नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत शिवाजी विद्यालय माथा येथील विद्यार्थिनी कुमारी राधिका पद्माकर साखरकर या विद्यार्थिनीने शाळेतून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी शेरज येथील विद्यार्थिनीच्या घरी जाऊन कुमारी राधिका साखरकर आई,वडील यांची भेट घेतली व कु राधिकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शिका संघटित व्हा व आपलं व आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करा असे बोलत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती वाघाडे सर,टेकाम सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशजी साखरकर व मुलीचे आई,बाबा उपस्थित होते















