✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-भारतीय जनता पक्षाच्या लोकाभिमुख धोरणांमुळे व विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे आज सर्वसामान्य जनतेचा विश्वास भाजपावर अधिक दृढ होत आहे, तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा एकमेव पक्ष असून लोकाभिमुख कार्य हाच भाजपाचा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील गांधीनगर येथे काल काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
🟦या प्रसंगी आमदार भोंगळे म्हणाले की, भाजप सरकारने गावागावात विकासाच्या योजना पोहोचवल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून शासन लोकहिताचे कार्य करत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांचा झंझावात सुरू असून लोकाभिमुख विकास हाच भाजप सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन आमदार भोंगळे यांनी केले.



⏭️यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये उमेश कोल्हे, बंडू बुटले, अख्तरभाई सय्यद, नामदेव ठावरी, अरविंद शेंडे, संजय शेंडे, संजय माशीरकर, रवी माशीरकर , ज्ञानेश्वर शिंदे प्रवीण चटारे, रवी चटारे, मोहन चौधरी, कवडू बल्की, विनोद रागीट, सुधाकर बल्की, जगदीश आदीरकर, देविदास खाडे, सतीश भोयर, निर्दोष भोयर, गणपत भोयर, शुभम चौधरी ,नितेश वासेकर, राजू शिंदे, मारोती चटारे ,महादेव चटारे, सचिन चटारे, विनय खाडे, सुरज खाडे, अमोल मालेकर, रवींद्र चटारे, अरविंद कुळसंगे, सुधीर पेटकर, गणेश आत्राम, मारोती नांदे, अंकुश कोल्हे, अविनाश कोल्हे, रमेश भोयर, निलेश कोल्हे , मनोहर पेटकर, नितेश वासेकर,योगेश शिंदे,नारायण झाडे, आदित्य भोयर ,सुरेश बांदुरकर,विनय खाडे,धीरज भोयर, मुर्लीधर भोयर, संतोष आमने, विठाबाई कटरे, योगिता कोल्हे, नंदा कोल्हे, गंगोत्रा कोल्हे, रेखा वासेकर, सुवर्णा पावडे, सुरेखा हंसकर,सुलभा आदे, सुनंदा महाकुलकर यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार भोंगळे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करीत विकासासाठी भाजपासोबत काम करण्याचे सांगितले.या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, धानोलीचे उपसरपंच ओम पवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते,कार्तिक गोंलावार, नैनेश आत्राम, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














