💢शेतकरी मंदिर येथील रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
वणी:-शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी वणी येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
🪅कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे या कार्यालयाचे संचालक आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

💢या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.













