शिवाजीनगरमध्ये 907 ग्रॅम गांजासह तरुणाला अटक; 1.03 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : भद्रावती अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत भद्रावती पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. शिवाजी नगर, नाग मंदिरामागे राहणाऱ्या एका तरुणाला 907 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोबाईल आणि दुचाकीसह एकूण ₹1,03,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🚨पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै 2026 रोजी भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, सोनल दशरथ महाकुळकर (वय 20, रा. शिवाजी नगर, नाग मंदिरामागे) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करीत आहे.
👉मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीच्या घराची व अंगझडती घेतली. यावेळी आरोपीच्या हिरो होंडा सीडी डिलक्स (MH-31-VS-9063) या दुचाकीच्या हँडलला लावलेल्या पिशवीत 907 ग्रॅम गांजा आढळून आला. यात गांजा – 907 ग्रॅम हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी जुना सॅमसंग मोबाईल असा एकूण ₹1,03,000 चा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा क्रमांक 685/2026 अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
🚨ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली.
🚨 शिवाजीनगरमध्ये गांजा विक्रेता गजाआड!
भद्रावती पोलिसांची कारवाई. सोनल महाकुळकर वय 20 याच्या दुचाकीवरून 907 ग्रॅम गांजा जप्त. मोबाईल + बाईकसह 1.03 लाख मुद्देमाल. NDPS नुसार गुन्हा दाखल. SP आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात PI योगेश्वर पारधी यांची धडक कारवाई.












