✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सामाजिक सुरक्षा साहता २०२० नुसार आता कामगारांचा रकमेत वाढ होणार असुन ६० वर्ष वयाचा कामगारांना व सतत १० वर्ष पुर्ण नोंदत असणाऱ्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देणार येणार असल्याचे कामगार मंत्री अँड. आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे.
ज्या कामगारांचे वय ६० वर्ष आहे व त्यांनी सतत १० वर्ष कामगार म्हणुन ज्यांची नोंद आहे अश्या कामगाराना प्रतिवर्षी ६ हजार रुपये तर ७५ टक्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी ९ हजार रुपये तसेच २० वर्ष नोंदणी झालेल्या कामगरांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन थेट त्यांच्या बॅक खात्यात जमा केले जाणार आहे. लाखो बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य म्हणुन दिलासा मिळणार असल्याचे कामगार मंत्री अँड. आकाश फुडकर यांनी म्हटले आहे.












