पत्रकारांच्या विविध समस्यांसाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाने लढा उभारणार
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
जिवती/चंद्रपूर :- पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नाथा देवराम उंद्रे (पाटील) यांनी पत्रकार संरक्षण संघाच्या विदर्भ प्रांत (महाराष्ट्र) अध्यक्षपदी शब्बीर नुरुद्दीन सय्यद (जागीरदार) यांची नियुक्ती केली आहे. पत्रकारांच्या विविध समस्या, अडचणी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांबाबत कायदेशीर व सनदशीर मार्गाने आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

✍️पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे तसेच पत्रकार बंधू-भगिनींना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची भूमिका पत्रकार संरक्षण संघाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
विदर्भातील पत्रकारांना एका व्यासपीठावर एकत्रित आणून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी कायदेशीर व सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याची जबाबदारी शब्बीर नुरुद्दीन सय्यद ( जागीरदार ) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकार बंधू-भगिनींच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून बुलंद आवाज उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या नियुक्तीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील विविध स्तरांतून शब्बीर नुरुद्दीन सय्यद यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















