5 जुगारी रंगेहात, ₹2.14 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : भद्रावती शहरातील पाटील नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत 5 जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी 3 मोटारसायकली व 5 मोबाईलसह एकूण ₹2 लाख 14 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पाटील नगर येथे काही इसम पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजितीचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच भद्रावती पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. या कारवाईत खालील 5 जणांना ताब्यात घेण्यात आले यात धनराज कवडुजी कांबळे – वय 63 वर्ष, धर्मराज नामदेव गायकवाड – वय 66 वर्ष, रविंद्र बापुराव माकोडे- वय 52 वर्ष, अमोल शामराव दुरडकर – वय 34 वर्ष, देवानंद खुशरंग पाटील – वय 52 वर्ष असे आरोपींचे नावे आहेत
आरोपींच्या अंगझडतीत तसेच घटनास्थळावरून 3 मोटारसायकली आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.पंचनामा करून सर्व आरोपींविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशन अप. क्र. 715/2026, कलम 4 व 5 मजूका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोउपनि संतोष केदार, गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, तसेच पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे आणि संतोष राठोड यांनी ही कारवाई केली. भद्रावती पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भद्रावतीत जुगार अड्ड्यावर छापा, 5 जणांना अटक
पाटील नगरमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची कारवाई. 5 जुगारी रंगेहात पकडले. ₹2.14 लाखांच्या 3 दुचाकी व 5 मोबाईल जप्त. मजूका कायद्यानुसार गुन्हा दाखल













