गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
वरोरा :- स्मृतिशेष नेताजी वि तू बुरचुंडे, भा. गो. टिपले सारख्या नेत्यांनी डॉ.बाबासाहेबा
आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जिवंत ठेवण्याचे काम केले. ते दादासाहेब गायकवाड पासून तर दादासाहेब रा. सु. गवई आणि आता डॉ. राजेंद्र गवई पर्यंत हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ राहीले. त्यांच्या जाण्याने पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. असे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र द्वारा जेतवन बुद्ध विहार कर्मवीर वॉर्ड वरोरा येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती आणि नागपूर प्रदेश उपाध्यक्ष स्मृतिशेष नेताजी वि. तु बुरचुंडे आणि वरोरा ता. अध्यक्ष भा. गो. टिपले श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन म्हणाले की, आज देशातील कोणताही पक्ष असो वा परिवर्तनवादी आंदोलन असो अशोक चक्रांकित निळ झेंडा लावल्याशिवाय काम भागत नाही आणि हा झेंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकृत झेंडाआहे. या झेंड्याशिवाय सत्ताधारी, विरोधी पक्षांचेही भागत नाही आणि यांच्या विरोधात होणाऱ्या परिवर्तवादी आंदोलनाचेही भागत नाही. एवढे महत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देशात आहे. तो. रिपब्लिकन पक्ष आपण विसरत चाललो आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही केवळ पार्टी नसून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे. हे लक्ष्यात घेण्याची आवश्यकता आहे अँड. मनोहर पाटील म्हणाले की उपवर्गीकरण हा आर. एस. एस. चा कार्यक्रम आहे. याला मातंग समाज बळी पडला असून त्यांनी ना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेतला ना.अण्णाभाऊ साठे ही शोकांतिका आहे. अँड. चंद्रशेखर देवतळे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या विचारांनेच या देशात परिवर्तन येऊ शकते. त्याकरिता आंबेडकरी समाजाने ओबीसी ना जवळ केले पाहिजे.
कार्यक्रमाचे उदघाटन नागपूर प्रदेश उपाध्यक्ष बाजीराव उंदीरवाडे यांनी केले. नागपूर प्रदेश उपाध्यक्षा लिनता जुनघरे, चंद्रपूर ज़िल्हा महिला आघाडी अध्यक्ष्या नंदा रामटेके, जगदीश मालके यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रस्तविक आणि आभार प्रदर्शन संतोषभाई रामटेके संचालन अरुण देवगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल वानखेडे,पुरुषोत्तम वैद्य, छाया लभाने, छाया कांबळे, करुणा गोटे इत्यादी कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.













