✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील सध्या अवैध दारु विक्रीने सिमा ओलांडली .कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत. येणाऱ्या अनेक गावांमध्ये दारूचा महापूर आला आहे . गल्ली बोळात मिळणाऱ्या अवैध दारू ग्रामीण भागातील शांतता व आरोग्य धोक्यात आले असुन या गंभीर प्रकरणाकडे पोलीस विभाग जाणून पूर्व दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. माहितीनुसार कोरपना. पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावे. नारडा.फाटा.नारडा. वस्ती.सागोळा.वनोजा. सावलीहिरा.कानाळगाव.परसोडा.फाटा. परसोडा. वस्ती. दुर्गाडी. रूपापेठ.धनकदेवी.धानोली तांडा.येरगवहान.या गावात अवैध दारू विक्रेते डिनर होऊन गावामधील मुख्य चौकात अवैध्य दारूची विक्री राज रोज पणे सुरू आहे काही ठिकाणी तर मद्यप्रेमींना होम डिलिव्हरी सुद्धा मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे प्रत्येक गावात विविध दारू ओम डिलिव्हरी करणारा वनसडी.कोरपना. पारडी.अतंरगाव.
येथील डीलर असल्याचे बोलले जात आहे.या पुर्वी सुधा आमदारांनी अवैध दारू पकडली आहे. तरी पन परिस्थिती सुधारली नाही.पोलिसाची भीती उरली नसल्याने हे विक्रेते आता खुल्या व्यापार करत असून त्यामुळे वाईन शाप पेक्षा अवैध अड्ड्यावर गर्दी अधिक दिसत आहे. येथिल पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हे अवैध्य धंदे सुरू असताना पोलीस कारवाई का करत नाही. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधून मधून होणाऱ्या किरकोळ कारवाया केवळ देखावा करत असून मुख्य तस्करांना पोलीसाची अभय आहे का अशी चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे.महीना भरला वसुली करतात.मग अवैध दारू कशी बंद होणार हा. मोठा प्रश्न उभा आहे.युवा पिढी आणि कष्टकरी वर्ग संकटात. अवैध दारूचा सर्वाधिक फटका शेतमजूर आणि तरुण पिढीला बसत आहे दिवसभराची मजुरी दारूच्या अड्ड्यावर खर्च होत असल्याने आणि गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर आले आहे गावागावात वाढलेल्या दारूच्या व्यसनामुळे भांडण तंटे घरगुती हिंसाचार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे ग्रामीण भागातील महिलांमध्ये या परिस्थितीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.














