✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-पोटेगाव केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद उच्य प्राथमिक केंद्र शाळा पोटेगाव येथे नवीन शैक्षणिक सत्रातील पहिली शिक्षण परिषद पार पडली. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापान समिती पोटेगावचे अध्यक्ष ओंकारेश्वर शेडमाके यांच्या शुभ हस्ते पार पडले तर अध्यक्ष स्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख विनोद रायपूरे सर होते.प्रमुख अतिथी म्हणून केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चक्रपानी कन्नाके, गट साधन केंद्र गडचिरोलीचे विषयतज्ञ् सुनील लोहकरे होते. परिषदेचे उदघाटन डाँ बाबासाहेब आंबेडकर व माता सावित्री आई फुले यांच्या प्रतिमेला मानवंदना करून तसेच शालेय विध्यार्थांच्या सुव्यवस्थित परिपाठाणे झाली. शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्रअंतर्गत राबविले जाणारे शैक्षणिक उपक्रम उजळणी पाठा द्वारे अध्ययन अनुभव कार्यशाळेत देण्यात आले. विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेला महत्व देऊन सखोल व उत्तम मार्गदर्शन केंद्र प्रमुखांनी केले.सोबतच विद्या प्रवेश, सेतू आभासक्रम, विद्यांजली पोर्टल, यु डाईस प्लस पोर्टल, पीजीं आय, ईकोक्लब, जयंत नारळीकर, खान अकॅडमी, परख शैक्षणिक उपक्रम,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मावा नाट मावा शाळा असे अत्यंत प्रभावी उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत त्याची उपक्रमशील अंमलबजावणी काटेकोर पणे राबविण्यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन मान्यवरांचे झाले. यासाठी राजू उंदीरवाडे सर जगदीश मडावी सर, शिला सिडाम मॅडम, सुनील लोहकरे सर, सरदू चिराम सर, निलेश नैताम सर, यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र शाळेतील संगीता कोल्हे मॅडम, लोखंडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला पोटेगाव केंद्राची सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगाधर मडावी मुख्याध्यपाक जि प प्राथमिक शाळा कन्हाळगाव यांनी करून आभार मानले.














