✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या माजी प.स सदस्या व आदिवासी नेत्याअमिता मडावी गडचिरोली यांनी उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर येथील कार्यालया समोर दिनांक ७ ऑगष्ट २०२६ पासुन बेमदुत ठिय्या आंदोलन सुरु केले असुन वादग्रस्त भष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांची सामान्य रुग्णालय गडचिरोली येथुन बदली होईपर्यत उपोषण सुरूच राहणार असे आदिवासी नेत्या अमिता मडावी यांनी सांगीतले.

गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. लाहाडे हे आपल्या मर्जीतील डॉक्टरांना चांगली वागणुक देणे व इतरांना वेगळी आपल्या क्वार्टरवर दोन चार चपराशी ठेवणे , रुग्णालयातील अस्वच्छता याकडे दुर्लक्ष करणे खरेदीत तफावत आदि विविध कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे अश्या कथित भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सकाची ताडतीने बदली करावी या मागणीसाठी समाजिक कार्यकर्त्या माजी प. स सदस्य अमिता मडावी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ नागपूर कार्यालय नागपुर येथे उपोषणाला बसल्या आहेत.















