✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-निसर्गाची संपन्नता , आदिवासींची संस्कृती , विकासाची नवी गती आकांशित जिल्हा ते विकसित जिल्हा बनविण्यासाठी जिल्ह्यातील कमकुवत बाजू दुर करण्यासाठी दिनांक १६ व १७ आगष्ट 202६ ला आर के सिलेबेशन हाल आरमोरी रोड गडचिरोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांत सर्व पक्षातील राजकीय व्यक्ती सामाजिक , NGo व कर्मचाऱ्यांनी सुध्दा कार्यक्रमास उपस्थित राहून आपली मते व्यक्त करावी असे आवाहन भाजपाचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे , रमेश अधिकारी , ॲड. कविता माहोरकर राजकुमार घोडे स्वार , नरेंद्र उंदिरवाडे उमेश उईके आदिची उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्हाच्या विकासासाठी सर्व विभांगांनी समान उदिष्टावर काम करणे आवश्यक आहे. यासाठी दिर्घ कालीन विकास आराखडा तयार करुन शेती उद्योग शिक्षण आरोग्य पर्यटन पर्यावरण व आदिवासींचा विकास करणे आदि उदिष्ट ठरविणे आवश्यक आहे व आज च्या परिस्थितीत विकासक्षमतेला बळ देण्याची गरज आहे असेही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.













