गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-दि. १० ऑगष्टला आश्रम शाळा जपतलाई येथे रात्रौ सहा मुलींना साप चावला त्यात तिन मुलींना जिव गमवावा लागला यात सहा प्रकल्प अधिकारी सादमवार यांनी मुख्याध्यापक दोन अधिक्षक व आश्रम शाळेचे अध्यक्ष मारोतराव कोवासे सचिव ॐड विश्वजित कोवासे सहीत पाच लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनमधे रिपोर्ट देऊन गुन्हा दाखल केला. परंतु सदर शाळेला एकदाही भेट न देणारे नोटिस न देणारे पाहणी न करणारे सहा. प्रकल्प अधिकारी प्रभु सादमदार हे दोषीआहेत दोषी फियार्दी कसे राहु शकतात म्हणून प्रशासनाने सर्वप्रथम सहा. प्रकल्प अधिकारी प्रभु सादमवार यांची चौकशी करून त्यांना दोषी ठरवुन त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शासनाकडे उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत करजले.
प्रशासनाचे काही लोक संस्थाचालक व शाळेच्या कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून मोकळे झालेत. परंतु एवढ्या जुन्या आश्रम शाळेत सहा. प्रकल्प अधिकाऱ्यांची एकही व्हिजिट दिलेली नाही किंवा एकही नोटिस दिलेला नाही. एवढ्या मुला – मुलींना बेड आहेत किंवा नाहीत सरपण चा ढिंग , विटाचा ढिंग दिसलाच नाही यावरून सहा. प्रकल्प अधिकारी हेच सर्वश्री दोषी आहेत कारण संस्थाचालक व सहा. प्रकल्प अधिकारी हे मिलीभगत आहेत.
सदर आश्रम शाळा शासन बंद करणार असे मी ऐकले आहे यावर हा उपाय नाही सदर शाळेवर प्रशासक नेमावे किंवा दुसऱ्या एका चांगल्या व्यक्तीला चालवायला घ्यावी कारण एक दिड महिन्यात दिवाळी सत्र संपणार आहे तेव्हा १२५ मुले व ११० मुलींचे भवितव्य आज धोक्यात आहे. शाळा बंद करू नये असे जपतलाई गावकऱ्यांची मागणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यत 26 विद्यार्थी विषबांध तलावात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. गडचिरोली जिल्हा मृत्युचा सापळा झालेला आहे आदिवासी विद्यार्थांवर दिवसेन दिवश अन्याय होत आहे. मी दानवे न बोलवता आलो, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष गडचिरोली जिल्ह्यात त्या दिवशी होते परंतु त्यांनी साधी भेट दिलेली नाही. भाजपाची संस्कृती वेगळी आहे त्यांना आदिवासींच्या जिवनासी काही देणे घेणे नाही फक्त निवडणुका व आमदार खासदार फोडणे एवढेच त्यांचे काम आहे असेही अंबादास दानवे म्हणाले. पत्रकार परिषदेला उबाठाचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम उपस्थित होते.














