गडचिरोली -मुनिश्वर बोरकर
चामोर्शी:-चामोर्शी तालुक्यातील घोट जवळील मजेगांव येथे रिपब्लिकन पार्टी ची बैठक RPI चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे उपाध्यक्ष मिलिंद अंबादे माजी सरपंच गंगाधर रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ ऑगष्ट २०२६ रोजी पार पडली.



मार्गदर्शन करतांना मुनिश्वर बोरकर म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित एकमेव रिपब्लिकन पक्ष आहे . या पक्षाचे जिल्हा अधिवेशन दि. २१ ऑगस्टला गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेले असून पक्ष संघटना मजबुत करण्याकरीता घोट सर्कल च्या सर्व कार्यकर्त्यानी एकजुटीचे दर्शन घडवावे.
सदर बैठकीला प्रकाश मोहुर्ले गंगाधर रामटेके राकेश आलाम संजय गोरडवार परमेश्वर मोहुर्ले विठुजी जोक गल्लीवार सुरेश गेडाम मोहन बंडावार प्रमोद रामटेके जयश्री रामटेके शामलता रामटेके सहीत मजेगांव चे कार्यकर्ते बहुसंख्येनी उपस्थित होते.













