✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सुप्रशिद्ध गायक – कलाकार अनिरुद्ध वनकर चंद्रपूर हे दि. २१ ऑगष्ट २०२६ रिपाइंचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शुभेच्छा भेट देण्याकरिता येणार आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा गडचिरोली च्या कार्यकर्ता मेळावा व प्रा. मुनिश्वर बोरकर यांचा वाढदिवश शुक्रवार दि. २१ ऑगष्ट २०२६ ला दुपारी १२ वाजता यमुना हाल पोटेगांव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई अमरावती हे राहणार असून सदर कार्यक्रमात सुप्रशिद्ध गायक – कलाकार अनिरुद्ध वनकर हे उपस्थित राहणार आहेत असे कार्यक्रमाचे आयोजक RPI जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी कळविले आहेत.















