गडचिरोली -मुनिश्वर बोरकर
चंद्रपूर:-शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या स्मरणार्थ सिध्दार्थ बुद्ध विहार सिध्दार्थ नगर तुकूम चंद्रपूर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा चंद्रपूर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान मारोतराव रायपुरे जिल्हा अध्यक्ष शारदा खोब्रागडे राज्य कार्यकारीणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशेष अतिथी म्हणून सतिश रामटेके सचिव सिध्दार्थ बुद्ध विहार सिध्दार्थ नगर तुकूम चंद्रपूर हे उपस्थित होते. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून संघटनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. संघटनेच्या पदाधिकारी आयुष्यमती लताताई टिपले व आयुष्यमती सुरेखा रामटेके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुरूवातीला भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाला श्रीमती गंगा हस्ते मॅडम, आयुष्यमती जयंती वनकर मॅडम, मुक्ता पेटकर मॅडम,रीना रायपुरे मॅडम,आयुष्यमान देवीदास दुर्गेसर,आयुष्यमान मुकेश मेश्राम साहेब,आयुष्यमान रामटेकेसर,,आयुष्यमती करूणा गेडकर मॅडम,आयुष्यमान सुनीलसाव,आयुष्यमान श्रीधर भगत तसेच संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष आयुष्यमानभिमलाल साव व सुत्रसंचालन आयुष्यमान नागेश पेटकर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गंगा हस्ते मॅडम इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर मान. जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना संघटनेचे निवेदन देण्यात आले.














