✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्र हददीतील नवरगांव येथे हत्तीचा कळप आल्याने नवरगांव ते चुरचुरा मार्गावरील अनेक शेताची नासधुस करीत असल्यामुळे नवरगांव वासीय अंख्ख गाव जेवण न करतांच हत्तीच्या कळपा कडे धावत सुटले.
आज दिनांक ३१ ऑगष्ट रात्रौ ७.30 चे सुमारास हत्तीचा कळप देलोडा मार्ग नवरगांव येथे धडकला आणि सदर हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांचे रोवणे नष्ट करीत चुरचुरा मार्ग आगेकुच करीत असतांना नवरगांव वासीय हत्तीचा कळप गावात येऊ नये म्हणून स्टार्च टेंभे घेऊन हत्तीच्या कळपाकडे जात सुटके यात अख्ख गांवच जागा झाले असून याची माहिती वनविभाग पोर्ला चे Rfo यांनी देताच वनविभाग कर्मचाऱ्यांना पाठवितो असे गावकऱ्यांना सांगीतले आहे.
मागील महिन्यात सुद्धा सदर हत्तीचा कळप पोर्ला नवरगांव रोडवर पुराच्या पाण्यात अडकला होता. आज मात्र तो चुरचुरा कडे जात असून हत्तीचा कळप गोगांव किंवा काटली कडे जाणार हे निश्चित झाले आहे. तरीही नवरगांव वासींय रात्रौ जागुन काटत असल्याचे कळते.















