✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील मोठे गांव पोर्ला येथे बरेच दारू विक्रेत आहेत त्यामुळे गावातील सुव्यवस्था बिघडत चालली असून लहान मुले सुद्धा दारूच्या आहारी जात आहेत यावर आडा बसावा म्हणून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अनेकदा निवेदन देण्यात आले परंतु व्यर्थ त्यामुळेआज दिनांक ०१/०९/२०२६ रोजी
मौजा पोर्ला येथील ” महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती पोर्ला ची नवनियुक्त समिती, च्या वतीने
मा. जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदन समिती चे अध्यक्ष ईश्वर मारोती तिवाडे, उपाध्यक्ष विश्वनाथ बुलन म्हशाखेत्री, सचिव हितेंद्र गजानन बारसागडे, समितीचे सदस्य रविंद्र आनंदराव सेलोटे, निलकंठ कवडू संदोकर,रामकृष्ण लालाजी बोरूले,लोमेश नामदेव कोलते,पंकज वसंत येवले,मा. माधव अंताराम निकुरे व इतर सदस्य प्रत्यक्ष उपस्थित राहून गावांमध्ये सुव्यवस्था, शांतता, सलोखा, स्वच्छता राखण्यासाठी आणि गावातील अवैध दारू विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी व आपले गाव सक्षम सुदृढ, पारदर्शक असण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.
















