संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्रंमाक १०८ च्या गाड्या पेंशन्टला पोहचवितांना किंवा वापसी प्रवासात कुठेही तासन तास थांबतात त्यामुळे एखाद्या अर्जन्ट पेंशन्टने क्रमांक १०८ ला फोन केला तर गाडी क्रमांक १०८ वेळेवर पोहचत नाही त्यामुळे निप्पाप रुग्णाला जिव गमवावा लागतो
पेरमिली पीएससी मध्ये ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे अल्पवयीन आदिवासी बालकांचा जीव गेला याला जबाबदार कोण डॉक्टर की ॲम्बुलन्स चालक ..
ॲम्बुलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे आलदंडी ( टोला ) या गावातील महिलांचा मृत्यु झाला ॲम्बुलन्स वेळेवर गोरगरीब रुग्णाला मिळत नसल्यामुळे रुग्णांला जीव जमवावा लागतो.
चामोर्शी तालुक्यातीक वैनगंगा नदि पलीकडेआष्टी गडचांदुर रोडवर ॲम्बुलन्स तासन तास उभी होती आणि बिअर बॉर चे दुकान जवळच होते. क्रमांक १०८ ची गाडी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णाला पोहचवून वापसी मधे थेट आष्टी तारसा रोडवर तासन तास विसावा घेत उभी होती. सदर गाडी ग्रामीण रुग्णालय ची असावी अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा DHO गडचिरोली ने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.






