संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली -पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील प्रविण प्रशिक्षकांच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रतिनीधीचे नुकतीच बैठक पार पडली
. ही बैठक ऑनलाईन पध्दतीने राज्य भरातील सर्व प्रशिक्षकांना मते मांडण्यासाठी खुली होती.
या बैठकी मध्ये दिवंगत आशिष बोरा यांना भावपूर्ण श्रध्दजंली वाहून बैठकीस सुरवात झाली या बैठकीत मागिल कामकाजाचा आढावा घेण्यात आला.गेल्या दोन वर्षा पासून राज्यभरातील प्रशिक्षक संघटन करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार आजच्या बैठकी मध्ये राज्य अध्यक्ष व कार्यकारणी निवडण्यात आली
राज्य अध्यक्षपदासाठी अशोक सब्बन यांच्या नावाचीसूचना मांडली व एकमताने राज्य अध्यक्षपदी अशोक सब्बन यांची निवड करण्यात आली

या बैठकीत राज्य कार्यकारणी साठी उपाध्यक्ष राहूल बागडे नागपूर,सरचिटणीस विलास सुरवसे लातूर,सहसचिव गोंविद विभूते सोलापूर, कोषाध्यक्ष प्रशांत पाटिल नाशिक, यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपस्थित असलेल्या सर्वाचेयजमान सोलापूर जिल्ह्यातील संघनेने सोलापूरी टोपी देऊन स्वागत केले.
महाराष्ट्र प्रशिक्षक विकास संस्था या नावाने नोंदणीकृत संस्था अहिल्यानगर येथे नोंदवण्याचा, जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी असे दोन सदस्य हे राज्य कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्य असतील या पैकी एक महिला सदस्य असतील असा निर्णय घेण्यात आला.
प्रशिक्षकांच्या कौशल्य विकास ,विविध विषयाचे सखोल ज्ञान , प्रशिक्षणाच्या विविध संधी या संदर्भात कार्य करण्यात येणार असून शासकीय पातळीवर प्रशिक्षण व प्रशिक्षक धोरण,प्रशिक्षकांना येणाऱ्या आडचणी,अन्याय कारक भूमिका इ. मुद्द्यावर शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक संघटन कार्यरत करण्यात येणार आहे असे निर्णय बैठीत सर्वानुमते घेण्यात आले. या बैठकीत महिला प्रशिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली.





