प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
वरोरा : वरोरा येथील बस स्टॉप रोडवरील आयटीआय (ITI) लगत असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ येथील एक खळबळजनक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथून खरेदी केलेल्या चिवड्यात चक्क पाल आढळल्याने तो खाल्लेल्या सहा जणांना गंभीर विषबाधा झाली आहे.
✴️या घटनेमुळे वरोरा शहरात एकच खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूषित चिवडा खाल्ल्याने सहा जणांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. सर्व बाधित रुग्णांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बाधित रुग्णांची नावे :
१) सुवर्णा प्रवीण कोहळे (वय ४५, रा. माजरी)
२) प्रवीण शालिकराम कोहळे (वय ५०, रा. माजरी)
३) पंकज दिगंबर आवारी (वय ४०, रा. राळेगाव)
४) दिगंबर विठ्ठलजी आवारी (रा. राळेगाव)
५) अफजल रफीक अहेमदखान (रा. भद्रावती/कोगाव)
६) शेख रहेमान (रा. कोरेगाव)
७) आयुब सागीर खान (रा. भद्रावती)
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तात्काळ नमुने घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.














