संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-नामशेष होणाच्या मार्गावर असलेले रानम्हशी चे अभयारण्य आता कमलापुर जंगल परिसरात तयार होणार असल्याची माहिती आहे.
सिरोंचा वनविभाग अर्तंगत येणाऱ्या कमलापुर वनपरिक्षेत्रातील कोलामार्का सर्वधन राखीव क्षेत्राला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अभायारण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात मंजुरी मिळाली असून आता कमलापुर वनपरिक्षेत्रात रानम्हशींचे अभयारण्य उदयास येणार आहे. यापूर्वीच कमलापुर येथे राज्यातील एकमेव शासकीय मोठे हत्तीकॅम्प असल्याने पर्यटणाची मोठी गर्दी जमते आता रानम्हशींचे नवे माहेरघर मिळत असल्यामुळे पर्यटकांना हत्तीसह रानम्हशींचेही दर्शन होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सघः स्थितीत चपराळा , भामरागड असे दोन अभयारण्य आहेत आता तिसरे अभयारंण्य कोलामार्का ठरणार आहे. कमलापूर जवळ इंद्रावती नदि असुन पलीकडे छत्तीसगड सिमा आहे. इंद्रावती नदिच्या दोन्ही बाजुला रानम्हंशी मुक्तसंचार करतात म्हणुन रानम्हशीचे अभयारण्य कमलापुर जंगल परिसरात व्हावे व सदर परिसर रानम्हशींचे पर्यटन स्थळ व्हावे यासाठी कमलापुरचे RFO गडमडे व DCF साहेबांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता महाराष्ट्र वन्यजिवी मंडळाने कमलापुर जंगल परिसरात रानम्हशींचे पर्यटनास मंजुरी दिलेली आहे. कमलापुर रानम्हशींचे अभयारण्य होणार जरी असले तरी ते ताडोंबा अर्तगत असणार आहे याची फक्त देखरेख मात्र कमलापुर वनविभाग कार्यालयाकडे राहील आता सेंचुरी घोषीत होणार असुन तशी प्रोसीजर सुरु आहे असे कमलापूर RFO गडमडे यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान सांगीतले.








