✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
वरोरा:- दिनांक ३० जानेवारी २०२६ ला आरोग्य संचालक यांची बैठक व भेट उत्तम रित्या व उत्साहात पार पडली.
मा .डाॅ.आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा यांनी सर्व बाबींचा आढावा घेतला.आतापर्यत उत्तम काम झाले त्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.काही उणीवा जाणवल्या त्या पुर्णतःस नेण्याचे सुचविले.सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेवराव चिंचोळे , डॉ हेमंचंद कन्नाके आवुटरिच निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ भगत डी.एच.ओ.डाॅ.जिवतोडे , डॉ.बोरकर तालुका अधिकारी, डॉ. खुजे वैद्यकीय अधिक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डॉ गेडाम स्त्रीरोग तज्ञ, डॉ.आकीब जनरल फिजीशीयन आणि सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य संचालक डॉ अंबाडेकर यांनी सर्व विभागाची पाहणी केली.जननी सुरक्षा योजना, महात्मे ज्योती
बा फुलें योजना,सुमन कार्यक्रम, इत्यादी विषयांवर चर्चा केली.कर्मचारी यांच्या वेतनाबाबत चर्चा केली काही बाबतीत संचालक मंडळातील व्यक्तींना आदेशीत केले.ऊत्तमरित्या आढावा बैठक व भेट पार पडली.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








