विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व संघभावनेला मिळाली चालना
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :- इन्फंट जीजस सोसायटीद्वारे संचालित इन्फंट जिजस हायस्कूल, राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने दोन दिवसीय क्रीडा सत्राचे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू व मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रीडा सत्रामध्ये धावणे, क्रिकेट, फुटबॉल, लंगडी, रस्सीखेच यांसारख्या विविध मनोरंजक तसेच कौशल्यवर्धक स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व क्रीडास्पर्धात्मक वृत्तीने सहभाग नोंदविला. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य, चिकाटी आणि संघभावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक विकासालाही चालना मिळाली आहे.🎇🎇🎇🎇🎇🎇

💢या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, श्रुती यादव, स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समितीने अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासास बळकटी मिळते, त्यामुळे भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.








