✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
सिरोंचा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (दाभोळकर) शाखा गडचिरोली चे वतीने शासकिय आश्रम शाळा सिरोंचा येथे मुख्याध्यापक आरवेली यांच्या अध्यक्षतेखाली अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर अनिसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर अनिस चंद्रपूरचे विनायक रामटेके यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर विशेष जानिव जागृती , विद्यार्थ्यामधे विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून मार्गदर्शन करण्यात आले तर जादुटोणा बाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .
कार्यक्रमास जी. डी चव्हाण , वाघमारे सर , अधिक्षीका कु. ए ए .येलेकर आदिसहीत आश्रम शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.








