💢युवा प्रतिष्ठानचे आयोजन; शोभायात्रेत विविध आकर्षक कलाकृती
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवा प्रतिष्ठान, कोरपना यांच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा बसस्थानक परिसरातून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पार पडली. शोभायात्रेदरम्यान शीख मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक, लोककला दशावतार प्रयोग, मल्लखांब सादरीकरण तसेच हलगी वादक ग्रुप यांच्या आकर्षक कलाकृतींनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यावेळी कोरपना पोलिस निरीक्षक लता वाढीवे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, नगर उपाध्यक्ष इस्माईल शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्याम रणदिवे, सुरेश मालेकर, पुंडलिक गिरसावळे, भारत चन्ने, रसूल पटेल, मनोहर चन्ने, सुभाष तुरानकर, अविनाश मुसळे, विनोद नवले, सतीश गज्जलवार, इरफान शेख, भाऊजी चव्हाण, घनश्याम नांदेकर, वहाब भाई, गणेश गोडे, डॉ. प्रकाश खनके, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे, गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष संजय मेंढी, नगरसेवक तुषार बावणे, चेतन शेंडे, अर्चना मोरे, बाबाराव मालेकर, राहुल मालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान
“एक दिवस गावासाठी”
💢या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविणाऱ्या सांगोडा, पिपरी व शेरज येथील युवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर
“श्वासात राज्य, ध्यासात राज”
या कार्यक्रमातून स्वराज्य वीरांची अमरगाथा सादर करण्यात आली. यामध्ये मराठी चित्रपट अभिनेते अजय पूरकर, अभिनेत्री स्मिता शेवाळे, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर तसेच अवधूत गांधी यांचा प्रमुख सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बावणे यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल मालेकर यांनी केले. श्रीकांत लोडे, पियुष कावरे, विशाल भोयर, संकेत राऊत, जतिन अडकिने, पियुष नागपुरे, अभिषेक ईटनकर, प्रतीक डोंगे, समीर आमने, नईम शेख, अर्जुन आवारी, नयन पानघाटे, प्रीतम बलकी, महेश गैनेवार, पिंटू पंधरे, गोलू बोमपल्लीवार, विनीत गंगशेटीवार ,बंटी भोयर, अक्षय इटणकर ,साहिल मुक्के यांनी जयंती उत्सवासाठी अथक परिश्रम घेतले. या जयंती उत्सवाला तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.








