✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर येथील धान खरेदी सुरु होती आता धानांने गोदाम भरले म्हणुन बाहेर धानाचे पोते ताळपत्री अभावी कसे खरेदी करावे म्हणुन आविस ने धान खरेदी केंद्रच बंद केल्यामुळे कास्तकारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
झिंगानुर परिसरात लोहा येडसिली मंगीगुडम कर्जेली किष्टयापल्ली रमेशगुडम कोर्ला पुलीगुडम कोपेला व झिंगानूर आदि गावाचे शेतकरी येतात परंतु धान खरेदी बंद पडल्यामुळे १० गावातील शेतकरी चिंतेत आहेत. तेव्हा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धान खरेदी लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी झिंगानूर येथील लोकसेवक रामचंद्र कुमरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.









