संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
गडचिरोली:-गडचिरोली शहरातील लांजेडा परिसरात फर्निचरच्या पैशाच्या देवान घेवाण प्रकरणातील वादातून झालेला खुण , आरोपी लगेच फरार झाला होता परंतु गडचिरोली पोलिसांनी चक्र फिरवुन त्याचा शोध घेणे सुरुच होते अश्यातच आरोपी महेश महादेव बुरांडे वय ४३ वर्ष हा चंद्रपूर न्यायालयाच्या परिसरात सापडला पोलीसांनीअवघ्या २० तासाच पकडून त्याला गडचिरोली पोलीस ठाण्यात आणण्यात पोलिसांना यश आले.
सचिन रामचंद्र कोललुवार हा फर्निचर बनविण्याच्या कामाकरीता दिलेले दिड लाख रुपये महेश बुरांडे यांनी फर्निचर न बनविता पैसे परत करत नव्हता म्हणून मृतृकाने त्याच्या घरी लांजेडा येथे जावून पैशाची मागणी केली असता आरोपीने सर्वप्रथम सचिनच्या डोळ्यात मिरची पावडर फेकला व फर्निचर बनविण्याच्या धारदार हत्याराने सचिनवर अनेक वार करून त्याचा मर्डर करून आरोपी पसार झाला होता.
गडचिरोली पोलिसांनी चक्र फिरवुन आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे पोलीसांना त्याचा लोकेशन मिळत नव्हता त्यांचा अनेक नातेवाईकांच्या घरी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु चामोर्शी वरून आरोपी चंद्रपूर पळाला होता कारण त्याचे नातेवाईक त्याला मदत करीत होते तरीही पोलीसांनी शोय माहीम सुरुच ठेवून शेवटी चंद्रपूर न्यायालयांचा परिसरातुन आरोपींना पकडून त्याला गडचिरोली पोलीस ठाण्यात आणले आज न्यायालयात हाजर करून त्यांचा पिसिआर मागणार असल्याचे कळते.👇👇👇👇👇








