संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
अहेरी:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती सन्मान म्हणुन तालुका पत्रकार संघाच्या वतीने समाजसेविका शुशीला भगत हिचा सत्कार करण्यात आला.
संत मानव दयाल आदिवासी विकास संस्था अहेरी येथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास बटालियनचे प्रमुख अधिकारी किंडो प्राणहिता अहेरी सीआरपीएफचे प्रमुखअनिल मोरे आलापल्लीचे R fo दिपाली तलमले पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रुषी शुकदेवे मनोरमा जांगी नायब तहसिलदार अहेरी मुख्याध्यापक भरडकर आदिची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्त्या संविधान जागृतीचा पुरस्कर्त्या तथा नेपाळ मधील उपराष्ट्रपती कहून मानवता पुरस्कार प्राप्त सुशीला भगत अहेरी यांचा पत्रकार संघटना अहेरी तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पत्रकार रुषी शुकदेवे आरिफ खॉन पठाण सचिव रमेश बामनकर सदाशिव माकडे डॉ. दुर्गे दिपक चुनारकर बबलु सडमेक श्रीकांत दुर्ग आदिंनी सहकार्य करून महिला शक्तीचा सन्मान केला.








